पंढरपूर प्रतिनीधी तेज न्यूज
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकनेते, माणसांच्या सुख-दुःखात धावून जाणारे खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या गादेगाव येथील निवासस्थानी भेट दिली.
या भेटीत त्यांनी फाटे यांचे वडिलांसह घरातील सर्व सदस्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या बोलण्यातली सहजता आणि प्रेमाच्या नात्याची जिव्हाळ्याची झळाळी प्रत्येकाला भावून गेली. यानंतर गादेगाव ग्रामस्थांशी त्यांनी थेट संवाद साधत गावाच्या गरजा, अपेक्षा समजून घेतल्या.
यावेळी खा. निलेश लंके यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, डॉ रमेश फाटे यांचेसह गादेगाव येथील नागरिक उपस्थित होते.

