पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथे आज दिनांक २७ जून २०२५ रोजी सस्टेनेबल इनोव्हेशन इन सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजीनियरिंग या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू व प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश महानवर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, तारापाका विद्यापीठ चिली चे प्रा. डॉ. एडुआर्दो गॅल्वेझ सोटो, झागाझीग विद्यापीठ इजिप्तचे प्रा. डॉ. एम. ए. तौफिक, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सदर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेची प्रस्तावना मांडली. यामध्ये अशा शोधनिबंध परिषदेचा समाजाला व पर्यावरणाला होणारा फायदा पटवून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी शोधनिबंध परिषदेविषयी माहिती देत असताना सांगितले की पंढरपूर सिंहगड ने आतापर्यंत एकूण ९ शोधनिबंध परिषदांचे आयोजन केले आहे. भविष्यातील अर्थव्यवस्थेचा कणा स्टार्टअप्स ठरणार आहेत, जे नवनिर्मीती, नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारित असतील. रोजगाराच्या संधी वाढवणारे आणि देश घडवणारे स्टार्टअप्स हे आगामी युगाचे नेतृत्व करणार आहेत असे स्पष्ट मत मांडले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले. डॉ. प्रकाश महानवर यांनी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद आयोजन केल्याबद्दल सिंहगड महाविद्यालयाचे कौतुक व अभिनंदन केले. डॉ. महानवर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शोध निबंध परिषद आयोजित करणे म्हणजे आपले ज्ञान, कल्पना अशा निरनिराळ्या गोष्टींचे सादरीकरण करणे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयावरती आपले मत व्यक्त करताना सोलर एनर्जी चे महत्व सांगितले. नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्याचा सल्लाही दिला. ग्लोबल वार्मिंग कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे असे मत व्यक्त केले. जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर आपला भारत देश भविष्यात महाशक्ती शाली देश होईल असा विश्वास ही व्यक्त केला. त्यांनी शोधनिबंध परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, संशोधक तज्ञ यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात अगदेर विद्यापीठ नॉर्वे चे प्रा. डॉ. मोहन कोल्हे, क्यूशू संगयो विद्यापीठ जपान चे प्रा. डॉ. कोकी ओगुरा, तारापाका विद्यापीठ चिली चे प्रा. डॉ. अतुल सागडे, झागाझीग विद्यापीठ इजिप्त च्या प्रा. एच. एम. सादेलदीन इल शाल, ग्राफिक इरा विद्यापीठाचे डॉ. अमित श्रीवास्तव, ज्योती इन्स्टिट्यूट बेंगलोर चे डॉ. श्रीकेशवा के. एस., टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोवेशन सेंटर पुणे चे डॉ. संदीप काळे, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली चे डॉ. अनिकेत पाटील, रेवा विद्यापीठ बेंगलोर चे डॉ. सुमंत कुलकर्णी, एनआयटी रायपुर च्या डॉ. मीना मुर्मु, मेडी कॅप्स विद्यापीठ इंदोर च्या डॉ. शालिनी शर्मा, थापर इन्स्टिट्यूट पटियाला चे डॉ. आप्पासो गडदे, सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे चे डॉ. किरणकुमार जगताप, डॉ. आर. प्रभाकरा आदी मान्यवर उपस्थित राहिले.
कॉन्फरन्स चेअर डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, कॉन्फरन्स सेक्रेटरी डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, परिषद समन्वयक डॉ. सत्यवान जगदाळे, डॉ. सोमनाथ कोळी, प्रा. ओमकार बिडकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदे अंतर्गत काम करीत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सचिन घाडगे, डॉ. दीपक गानमोटे, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी वरदा बिडकर यांनी केले.