कोरोची प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन कागल,पेठ वडगांव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन कागल येथे आढावा बैठक आयोजन समितीच्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ मीनल ताई कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते प्रथम श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा प्रचार आणि प्रसार करणे,संत नामदेव महाराजांच्या कार्याची पताका उंचावण्याचे कार्य आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विश्व महासंमेलनाचा जागर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य.या विषयावर ही सभा पार पडली.या सभेस प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ मीनल ताई कुडाळकर यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पताका सर्व स्तरावर उंचावली पाहिजे व विश्व संमेलनासाठी नागपूर येथे समस्त शिंपी समाज बांधव एकत्र झाला पाहिजे. यासाठी या विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी समस्त शिंपी समाज बांधवांनी नागपूरला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरचा स्नेह मेळावा पार पाडावा असे आवाहन केले.तसेच पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे दादा तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जवंजाळ, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश पुकाळे,उपाध्यक्ष श्री भरत कोळेकर, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष श्री तुकाराम खटावकर, हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री अमित काकडे, श्री.शशिकांत पिसे, हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष श्री.नारायण काकडे,सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अश्विन बारटक्के,या व्यासपीठावर आरुड होते.मान्यवरांना श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या औचित्याने कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री धनंजय गोंदकर,प्रसिद्ध प्रमुख श्री विशाल खटावकर, ज्योती नाझरे,कागल तालुका अध्यक्ष जयकुमार रेळेकर,यांना संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन या पदावर नियुक्ती पत्र सर्टिफिकेट देण्यात आले .व त्यांचा गौरव करण्यात आला.
विश्व संमेलनाचे ध्येय धोरणे व उद्देश ,श्री संतोष मुळे दादा व शारदा जवंजाळ यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे आभार श्री सुनिल खटावकर प्रदर्शन यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल खटावकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता नामदेव महाराजांच्या पसायदानाने झाली. यावेळी समस्त कागल शिंपी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.