करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
सद्गुरू बजरंग तात्या महाराज पिसे यांचे आशीर्वादाने सुरू असलेल्या श्री संत नामदेव महाराज श्री संत सावता महाराज आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज यांच्या समाधी सोहळा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाचव कीर्तन पुष्प गुंफताना सोपान महाराज सानप यांनी सांगितले.
सुरुवातीला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे एक एक संता साठी या अभंगावर अतिशय सुंदर निरुपण करताना सांगितले की संत भेटणं आणि ते ओळखन आणि ओळखल्यानंतर त्यांचा सहवास लाभण हे दुर्लभ असलं तरी शरणागती पत्करल्यावर हे सहज शक्य आहे.त्यासाठी आपली श्रध्दा दृढ असणं महत्त्वाचं आहे.माणूस जर चांगल्या संगतीत राहिला. चांगल्या लोकांचा हात धरलास तर वाईट लोकांच्या पाया पडण्याची वेळ येत नाही.जसा ज्यांचा संग तसा रंग आयुष्याला लाभतो.त्यामुळे संतसंगतीत रहा बजरंग तात्या यांनी अफाट कार्य करुन ठेवलंय ते आष्युष्यभर जपा.जीवनाच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.जीव आणि संसार,जीव आणि मनुष्य,जीव आणि देव,जीव आणि संत.यावर अतिशय सुंदर विवेचन करत जीवाला उध्दरून जाण्यासाठी संतसंगत किती महत्त्वाची आहे सांगितले.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत बळीराम महाराज,श्रीहरी महाराज,शुभम महाराज, लक्ष्मण कवडे, नाईकनवरे सर यांनी केली.
यावेळी हजारो भक्त भाविक भक्तिरसात चिंब झाले.अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी श्री सिध्दनाथ मंदिर ट्रस्ट आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत.गुरुवारी राष्ट्रीय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार असून विशाल खोले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.