पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे मनुष्यवधाची घटना घडली असतानाच , याच दिवशी बुधवारी चळे गावात अनेक पाळीव कुत्र्यांवरकाळाने घाला घातला आहे.
कोणातरी संशयित व्यक्तीने कुत्र्यांना विष घालून मारण्याचे कृत्य केले आहे. दादा हरी शिखरे यांचा एक पाळीव कुत्रा या विषबाधेने दगावला असून,एकूण पाच कुत्र्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे.याचवेळी गावातील अनेक कुत्री गायब झाली असून , आणखी किती जणांचा जीव गेला आहे,हे कालांतराने समजणार आहे.
सर्व प्राणिमात्रांमध्ये कुत्रा हा प्रामाणिक प्राणी समजला जातो.परंतु मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे , त्याने इतर प्राणीमात्रांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी गावातील आखे कुत्रेजगत संपवण्याचा घाट घालणारा हा कावेबाज व्यक्ती कोण ? याचा तपासही काही दिवसातच लागणार आहे.
याचवेळी ज्यांचे कुत्रे या घटनेत मयत झाले , त्या दादा हरी शिखरे यांनी संशयित व्यक्तीचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. पाहूया काय आरोप आहे शिखरे यांचा ?