मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
धारावीतील अनाधिकृत शाळा माॅरनिंग स्टार हि बंद करण्याच्या ऐवजी हि शाळा जणू काही नविन असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करुन अनाधिकृत असल्याची बाब लपवून, शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची बाब लपवून या शाळेला नविन ईरादापत्र देण्याचे प्रकरण मुंबई चे माजी उपसंचालक संदिप संगवे यांच्या अंगलट आली आहे, *या प्रकरणी शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शासना कडे व बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती व संगवेंना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांना दिले.विषेश बाब म्हणजे हे दोन्ही आदेश एकाच दिवशी देण्यात आले.
या चौकशी मुळे माॅरनिंग स्टार प्रकरणी संदिप संगवे यांच्या अडचणीत अजुन वाढ झाली आहे, नितीन दळवी यांचा आरोप आहे कि संगवेंनी भ्रष्टाचार करून या अनाधिकृत शाळेस ईरादापत्र तर दिलेच पण शासनाची फसवणूक देखील केली, त्यांना माहित असताना देखील त्यांनी हि शाळा अनाधिकृत असल्याची बाब, शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल असल्याची बाब लपवली, या बाबत शासनाने देखील फेब्रुवारी २०२५ मध्ये संदिप संगवे यांच्याकडे खुलासा करण्याचे आदेश दिले होते, नितीन दळवी यांचा आरोप आहे की त्यांनी सबळ पुरावे शासनाकडे सादर केले आहेत तरी संदिप संगवेना त्वरीत सेवेतून निलंबित करावे.