पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर शहरातील वीर सावरकर चौक व आमदार भाई राऊळ चौकात हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी अ. भा.ग्राहक पंचायतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
शहरातील विविध चौकात हायमास्ट लाईट बसविले आहेत मात्र अत्यंत रहदारीच्या वीर सावरकर चौकात व तुळशी वृंदावन, यमाई तलाव ट्रॅक,रेल्वे स्टेशन,गणेशनगर,लक्ष्मीटाकळीकडे जाणाऱ्या, तालुका पोलीस स्टेशन, तहसील,पंचायत समिती इ. कार्यालयाकडे जाणाऱ्या आमदार भाई राऊळ चौकात लख्ख प्रकाशाची गरज असताना अद्याप तेथे हायमास्ट लाईट बसविलेले नाहीत. त्यामुळे अत्यंत गर्दीच्या ठिकाणी पुरेसा उजेड नाही ही वस्तुस्थिती आहे. तेथील मोठ्या वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन तेथे प्राधान्याने हायमास्ट लाईट बसविण्याची गरज आहे.
शहरामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने कोर्टी रोड ते 65 एकर या परिसरात पुलावर भाई राऊळ पुतळा व स्वातंत्र्यवीर सावरकर ते छत्रपती शिवाजी महाराज या मार्गावर दो तर्फा लाइटिंग केले आहे ही सुखद बाब असली तरीही याच चौकात सध्या अंधाराचे सावट आहे हे सावट दूर करावे म्हणून दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी दोन हायमास्ट दिवे लावावेत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली होती किमान यात्रेच्या काळात साधेपोलवर मरकुरी बसवले असते तरी सावरकर पुतळा व बहिरवळ पुतळा या चौकातील अंधार दूर झाला असता परंतु तसे न होता सर्वत्र लाईटचा झगमगाट परंतु सावरकर चौक भाई राऊळ चौक मात्र अंधारात हा रस्ता व्हीआयपी आहे याचाही विसर संबंधितांना पडला आहे तरी ताबडतोब या ठिकाणी दिव्याची व्यवस्था करावी अशी आलेल्या भाविकातून व नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे
वाहनधारक,पादचारी यांना जीव मुठीत धरून चौक ओलांडवे लागतात.त्यामुळे अपघातानंतर व्यवस्था करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतली जावी अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य अण्णा ऐतवाडकर,संतोष उपाध्ये, पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, प्रा.धनंजय पंधे,आझाद अल्लापूरकर, सदस्य सागर शिंदे,संजय खंडेलवाल,सतिश निपाणकर,अंकुश वाघमारे,शाम तापडिया,इंद्रजित फडे यांनी व्यक्त केली आहे.

