भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवीच्या मंदिर येथील पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा भाळवणी च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वक्ते हनुमंत येलपले म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमाचे आयोजित येथे करण्यात आले होते. यावेळी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी बाल शाखेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ही येलपले यांनी दिली.
यावेळी डॉ.नवनाथ खांडेकर, राम यलमार, प्रशांत माळवदे, विश्वजीत देशमुख, सुधीर मासाळ, योगेश चौगुले, रुषीकेश देशमुख, वैभव कारंडे, नरेंद्र देशमुख, अजिंक्य देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.