पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
वाघोली येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बीड जिल्ह्याची भूमिपुत्री डॉ.ज्योती ताई शिरसाट( पुणे) यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .
राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
गेल्या 15/20 वर्षापासून वाघोली आव्हाळवाडी येथे वैद्यकीय सेवांचे माध्यमातून डॉक्टर ज्योती शिरसाट यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून समाजसेवेचा छंद जोपासणाऱ्या महिला म्हणून पुणे जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते.
डॉक्टर ज्योती शिरसाट या मूळच्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील असून ग्रामीण भागाशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते आहे.समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्या गेल्या 15/20 वर्षांपासून करत असून त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा लागला असून राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉक्टर ज्योती शिरसाट यांची ओबीसी फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल आर. के. दिवाकर उपाध्यक्ष भुषण पवार राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,दिपा वैतकार वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विद्या ताई घुगे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे,
तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला जात आहे.

