म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड ता. माण येथील शिंपी समाज बंधू-भगिनींची बैठक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने उत्साही वातावरणात पार पडली. ही बैठक समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
२२ जुलै रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी साप्ताहिक पारायण, महाराजांची पालखीतून शहर मिरवणूक, ड्रेस कोड, महाप्रसाद आदी उपक्रमांचे नियोजन यावेळी उत्साहात करण्यात आले. यावेळी खेळीमेळीच्या चर्चेत महिला मंडळ, डॉ. फुटाणे, रमेश पोरे, राम चंदवाले, मनोज पतंगे, चंदु पोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचा अहवाल भिकू पोरे यांनी वाचून दाखवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सुवर्णा पोरे, शार्दूल फुटाणे, संदीप नामदास, गणेश नामदास यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार अश्विनी फुटाणे यांनी मानले.
या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये एकतेचा व अभिमानाचा सशक्त भाव निर्माण झाला असून, येणारा सोहळा भव्यतेने साजरा होणार याची झलक यामध्ये दिसून आली.