पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरामध्ये दि.६जुलै २०२५ रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या यात्रा कालावधीत सुमारे २० ते २५ लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले आहेत. या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी अश्या सूचना दिल्या आहेत त्या नुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहर व उपनगरे प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची यावर्षी वाढती संख्या विचारत घेता एकादशी दिवशी शहरात कचरा वाहतुकीची वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु गर्दी कमी होताच आषाढी एकादशीच्या मध्यरात्री पासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम चालू केले आहे जवळजवळ सर्व कचरा उचलण्यात येत आहे याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १३०० स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत मात्र उपनगरात अनेक ठिकाणी भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने दुर्गंधी पसरल्याचे तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाले आहेत तसेच यावर्षी पावसाची सुरुवात लवकर झाल्याने सखल भागात पावसाची पाणी साठल्याने डासाचे ही प्रमाण वाढत आहे त्यामुळे कचरा उचलण्याचे कामा बरोबरच नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जंतुनाशक पावडर फवारणी व ६ ब्लोअर मशीन व हातपंप ६ ने बायो कल्चर फवारणी करण्यात येत आहे त्यामुळे झालेल्या घाणीचे डीकंपोस्टिंग होऊन दुर्गंधी नष्ट होणार आहे. तसेच मलेरिया विभागाकडून ५० कर्मचारी ५ हातपंप द्वारे डासअळी नाशक फवारणी व ४ फॉगींग मशीन द्वारे धूर फवारणी करण्यात येते आहे, तसेच शहरातील भाग व रुळाच्या वरील भाग व उपनगर असे दोन भाग करण्यात आलेले आहेत जंतुनाशक व बायो कल्चर फवारणी सह, ,मँलेथॉन पावडर, सर्वत्र टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ४१ घंटागाडी आरोग्य विभागाकडील ६ टिपर, ३ कॉम्पॅक्टर, ६ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने १३०० सफाई कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी केले आहे.