विधी स्वयंसेवकांनी कायदे विषयक कार्य शाळेमध्ये केला सन्मान
मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव तथा न्यायाधीश मल्हार शिंदे यांचा विधी स्वयंसेवक यांच्या वतीने विधी सेवा प्राधिकरण जिल्हा कार्यालय सोलापूर येथे सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 'विधी स्वयंसेवक ' यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रम समारोपानंतर विधी सेवा प्राधिकरणाच्या मुख्य अभिरक्षक ॲड. स्नेहल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 'विधी स्वयं सेवक तथा अधिकार मित्र' रामलिंग महामुनी, नंदकुमार देशपांडे, सुनील यारगट्टी व राजन घाडगे आदी. नी सत्कार करून विधी सेवा प्राधिकरण तर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शर्मा म्हणाले की समाजातील वंचित घटकातील सर्व सामान्य नागरिकापर्यंत गरजूंना आवश्यकती कायद्याची मदत करून विधी सेवकानी आपले कर्तव्य पार पाडावे व आवश्यक त्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विधी स्वयं सेवकांना कायदे विषयक बाबीमध्ये मदत राहील असेही आश्वासित केले.
या कार्यशाळेमध्ये सुमारे 40 ते 50 विधी स्वयं सेवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.