पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठ यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत हनुमान विद्यालय सुपली तालुका पंढरपूर चा विद्यार्थी कु.प्रेम मनोहर वेदपाठक इयत्ता सातवी याचा या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. या यशा बद्दल प्रेम वेदपाठक याचा सन्मान डॉ. नवनाथ खांडेकर , प्रशांत माळवदे, प्रवीण लिंगडे , मनोहर माने, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक यलमार, सुपली गावचे सरपंच काजल घाटुळे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मुख्याध्यापक अशोक यलमार हे होते.
यावेळी शिक्षक मुलानी , लवटे , विलास पाटील , हनुमंत यलमार ,वेदपाठक , उत्पात , भिसे , कुलकर्णी , लता येलमर , कांतीलाल कदम, सुखदेव कावडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी डॉ. खांडेकर म्हणाले की महाराष्ट्रातून 11000 निबंध लेखकांनी सहभाग घेतला होता त्यात आपल्या इथून 1000 पेक्षा जास्त मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. आपल्या 1000 नाव नोंदणीत 2 विद्यार्थ्यांचा समावेश झालेला आहे. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , पदवीधरचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन कु.प्रेम वेदपाठक याचा सन्मान करून बक्षीस देण्यात येईल असे डॉ. खांडेकर यांनी सांगितले. व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर माने यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत यलमार यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रशांत माळवदे मानले. यावेळी पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.