पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर,मंगळवेढा अनुलोम भागातर्फे शासकीय अधिकारी,शासकीय योजना आणि अनुलोम मित्रांसोबत बैठकीचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली, जिल्हाप्रमुख पांडुरंग शिंदे यांनी अनुलोम संस्था आणि कार्य विषद करताना त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी काळोखे उपस्थित होते,त्यांनी ही उत्तम मार्गदर्शन केले,मुख्यमंत्री सहायता निधी चे सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. खांडेकर यांनी ही खास सोलापूर येथून येऊन माहिती दिली.
तहसील कार्यालय मधील रेशन विभाग आणि संजय गांधी निराधार योजना प्रमुख जे एम कुंभार ,आ आयूश्यमान भारत कार्ड योजनेचे प्रमुख राजेश जावडेकर ,तालुका कृषी सहायक खंडागळे ,सहायक तालुका कृषी अधिकारी आर एस दळवी ,पशुधन विकास अधिकारी,यांनी ही आपली मनोगते मांडली,
उपस्थित सर्व अधिकारी बंधूंना " वेळेचा योग्य सदुपयोग" या नावाचे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.शेवटी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी मानले.