पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका गटसचिव संघटना व डीसीसी बँक कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते आयोजित केला होता .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे होते.
केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी 151 उद्योग करण्याची परवानगी संस्थांना दिली आहे त्यानुसार संस्थांनी कर्जवाटप व वसुली एवढा एक कलमी कार्यक्रम न राबवता संस्थांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून समाज उपयोगी विविध उद्योग करावेत. संगणकीकरणामुळे संस्थांच्या लेखापदतीमध्ये पारदर्शकता आली असून सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून काम केल्यास सहकाराचे भविष्य उज्वल आहे. असे प्रतिपादन आमदार परिचारक यांनी केले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा बँकेचे व्यवस्थापक पदी मिलिंद देशपांडे, विभाग प्रमुख पदी दादासाहेब सावंत सीनियर बँक इन्स्पेक्टर पदी तानाजीराव मोरे, भारत झांबरे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाल्याबद्दल मा. आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच सेवानिवृत्ती निमित्त सुधीर भाळवणकर, मधुकर पवार ,भीमराव माने, तात्या लोखंडे, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिरसागर ,मोहन कसबे ,शंकर कावडे ,अशोक लंगोटे ,यांचा सन्मान करण्यात आला .सदर कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे, प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ पाटोळे व विजय मोकळे यांनी केले,प्रास्ताविक बंडू गुरव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचेआभार मधुकर कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर तालुका गट सचिव संघटने च्या पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.