सुपली प्रतिनिधी तेज न्यूज
आज दि . 12 जुलै 2025 शनिवार रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले नवक्रांती युवकमंडळ सुपली ता . पंढरपूर चे शिक्षणप्रेमी युवक कार्यकर्ते प्रशांत माळी व समाधान माळी तसेच त्यांचे मित्रपरिवार अजित माळी (सॉफ्टवेअर इंजिनियर ) ,सुपली गावचे पोलीस पाटील संतोष पवार , मारुती ऐवळे (मनसे अध्यक्ष ), कालिदास माळी यांच्यावतीने शाळेतील 70 विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागण्यासाठी पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
तसेच महेश जमदाडे , विष्णू लांडगे व श्रीमती अर्चना कोळी या शिक्षकांनाही महात्मा फुले यांचे गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड यासारखे उत्कृष्ट पुस्तके शाळेस भेट दिली आहेत.
त्याबद्दल महात्मा फुले नवक्रांती युवक मंडळाचे कार्यकर्ते शिक्षण प्रेमी माळी बंधू यांचे महेश जमदाडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.