सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचा पदग्रहण सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त वार गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे लायन्स क्लबच्या गौरवशाली परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात घंटानाद,ध्वजवंदनांने झाली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलानांने करण्यात आले. मावळत्या अध्यक्षांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून यथोचित सत्कार केले. अगं नंतर सेक्रेटरी लायन केदार स्वन्ने यांनी मागील वर्षाच्या अहवालाचे वाचन केले. लायन दीनानाथ धुळम यांनी इंडक्शन ऑफिसर लायन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा परिचय करून दिला.
लायन प्रा.स्वामिनाथ कलशेट्टी यांच्या नूतन सभासदांचा दीक्षा समारंभ, दीक्षाधिकारी ( इंडक्शन ऑफिसर ) एम.जे.एफ ला. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपल्या ओघावत्या वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सभासदांना आंतरराष्ट्रीय संघटनेचे सभासदत्व बहाल करून अभिनंदन केले. सभासदांना धातूचे पिन बहाल करण्यात आले.
तदनंतर लायन चंद्रकांत यादव यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन मोनिका सावंत यांचा सुपरिचय करून दिला. नंतर लायन्स क्लब आप सोलापूर सेंट्रलच्या पदग्रहण सोहळ्याचे पदप्रदान अधिकारी ( इन्स्टॉलिंग ऑफिसर ) एम.जे.एफ.ला मोनिका सावंत यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये,ओजस्वी वाणीने सूत्रबद्ध पद्धतीने क्लबच्या घटना व नियमानुसार प्रत्येक सदस्यांना त्यांची कर्तव्य सांगून पदप्रदान केली.
त्यानंतर नूतन अध्यक्ष लायन प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांना सपत्नीक बोलावून स्वामीनाथ कलशेट्टी यांना आपले क्लबचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.आपणच मुख्य प्रशासक असून प्रथेनुसार क्लबच्या सभा व संचालक मंडळाच्या सभांचे अध्यक्षपद स्वीकारायचे आहे. जेणेकरून हा क्लब आदर्श होईल,समाजास, प्रांतास व आंतरराष्ट्रीय संघटनेस भूषण ठरेल असे कार्य करावे.या जबाबदाऱ्या समजावून पदप्रदान केले व अत्यंत मानाचा क्लबच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून घंटा व गेव्हल प्रदान केले.
चालू वर्षात सर्वांनी तुमचे नेतृत्व मान्य केलेले आहे, आणि माननीय लायन अध्यक्ष, या क्लबने आपणास हा बहुमान बहाल केलेला आहे.त्याबद्दल मी व्यक्तिशः आपले अभिनंदन करीत आहे. सेंट्रल क्लबची तुमच्या नेतृत्वाखाली भरभराट होवो अशी शुभेच्छा लायन मोनिका सावंत यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी लायन ॲड.मल्लिनाथ पाटील, व्हाईस गव्हर्नर-1 लायन राजेंद्र शहा, रिजन चेअरमन ॲड. लायन श्रीनिवास कटकुर, झेड सी लायन मीना जैन, मुख्य अतिथी लायन मंगेश जोशी. इन्स्टॉलेशन चेअरमन लायन हरिहर महिंद्रकर,लायन राहुल दोशी इत्यादींनी अध्यक्षांच्या पुढील कारकीर्दीस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिले.
त्यानंतर नूतन अध्यक्ष लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, 'माझ्या क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी माझ्या संचालक मंडळासह तन-मन-धनाने सौजन्यपूर्वक, संवेदनशील मनाने,व प्रामाणिकपणे पूर्ण करून क्लबचं नाव लौकिक करेन अशी ग्वाही दिली.नूतन सचिव दीनानाथ धुळम यांनी उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षांनी घंटा नादाने कार्यक्रमाची सांगता केली. प्रदर्शनाने केली. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट,बहारदार सूत्रसंचालन लायन गिरधारीलाल मेहता व लायन अरविंद कोणसिरसगी यांनी केले उपस्थितानीं कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे सर्व पदाधिकारी,सदस्य गण,मित्रपरिवार,आप्तेष्टांचे बहुमोल सहकार्य लाभले