सोलापुर प्रतिनिधी तेज न्यूज
लोकशाहीचा चौथा स्तंभ जर्नालिझम असुन त्याकरीता राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था "द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली" यांचे नॅशनल लिगल सेल, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ व अभ्यासु विधीज्ञ ॲड. शिवाजी शा.कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नॅशनल लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश यादव तसेच राष्ट्रीय सरचिटणीस ॲड. अयुब पटेल यांनी नुकतीच त्यांची निवड केलेली आहे. यावेळी सोलापूरचे नुतन जिल्ह्याध्यक्ष ॲड शिवाजी शा. कांबळे यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना संस्थेच्या राष्ट्रीय धोरणानुसार विधी सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.
तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली यांनी केलेल्या निवडी बद्दल या संस्थेचे आभार मानले आहे.या निवडी बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.