शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
"पंढरीची वारी सनराईजच्या दारी," या घोषवाक्याने आणि ज्ञानोबा-माऊली तुकाराम या अभंगाने संबंध शेळवे परिसरातील वातावरण भक्तिमय झालेलं काल पहावायास मिळाले, निमित्त होते आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या सर्वात मोठ्या वारीचे...आणि त्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सनराईज पब्लिक स्कूल शेळवे ने आपल्या बाल चमुंची बाल दिंडी काढली होती,विठ्ठल रखुमाई च्या पोशाखात विद्यार्थी असे दिसत होते जणू साक्षात सावळा विठ्ठल अन रखुमाई समोर उभी आहे,विठ्ठल रुक्मिणी बरोबरच विद्यार्थ्यांनी संत तुकाराम,ज्ञानोबा माऊली, संत सावता माळी,संत गोरोबा कुंभार,संत कबीर, संत रोहिदास, कुर्मदास,संत चोखामेळा,बहिणाबाई,मुक्ताई, संत मीराबाई, राधा-कृष्ण यांच्या वेशभूषा उबेहूब साकारल्या होत्या,विठ्ठलाचे अभंग,जनाई च्या ओव्या,गवळणी इत्यादीनी शेळवे परिसर दनानून गेला..
सायकल रिंगण सोहळा, फुगडी,पावली इत्यादी खेळांनी विद्यार्थी विठ्ठल भक्तांचे देहभान हरपले होते..टाळ,विना,मृदंग आणि चिपळ्याच्या साथीने अप्रतिम नादब्रम्ह साकारण्यात आला..
विद्यार्थ्यांनी खेळलेल्या फुगड्या,पावली, गायलेले अभंग,गौळणी ऐकूण शेळवे गावातील विठ्ठल भक्तांचे कान आणि मन तृप्त झाले,शेळवे ग्रामस्थांनी मुलांच्या दिंडीचे स्वागत केले,शाळेच्या उपक्रमाचे आणि शिस्तीचे कौतुक केले,फुगडी आणि पावली साठी प्रशालेचे सहशिक्षक मोहन गायकवाड यांनी परिश्रम घेतले,पखवाजाची साथ संगीत शिक्षक योगेश गायकवाड यांनी दिली, तर मृदंग साथ प्रशालेचे सहशिक्षक मयूर भूमकर यांनी दिली,शिस्त आणि समन्वय राखण्याचे काम रामचंद्र मोकळे यांनी केले, विद्यार्थ्यांची वेशभूषा,केशभूषा पाहण्याचे काम सौ.दिपाली कुंभार,मनिषा गोरे,प्रियंका गाजरे,अश्विनी यलमार,सौ.भिंगारे,अस्मातारा शेख,ऐश्वर्या भाईक,संगीता बाबर,अदिती देठे,सौ.भुमकर,तृप्ती कोरे यांनी केले...
सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समता,बंधुता,सर्वधर्म समभाव,प्रेम,जिव्हाळा,आपुलकी, नामस्मरण,भक्ती,श्रद्धा इत्यादी मूल्ये रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अंकुश गाजरे, अजित लोकरे व समाधान गाजरे यांनी मोलाचे सहकार्य केले.