पुणे चिंचवड प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी ' ग्लॅम डॉक ' या डॉक्टरांच्या आगळ्या - वेगळ्या चॅरिटी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून घेण्यात आलेल्या या अनोख्या फॅशन शो मध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या डॉक्टर्सनी सहभागी होत रॅम्प वॉक केला.
एलप्रो मॉल,चिंचवड येथे हा 'ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो अतिशय उत्साहात संपन्न झाला.कशिश सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला डॉक्टर्स चा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे या चॅरिटी फॅशन शो मधून दिसून आले.या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष,पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार,आई फाउंडेशनच्या सई वढावकर,डॉ. निखिल गोसावी,दिपाली कांबळे,शो डायरेक्टर डॉ. रितू लोखंडे, डॉ श्रद्धा जवंजाळ, डॉ राहुल जवंजाळ, डॉ श्रद्धा जाधवर, डॉ सारिका इंगोळे, डॉ रसिका गोंधळे,पौर्णिमा लुणावत, लीना मोदी,पुणे सोशल ग्रुपचे स्वरूप रॉय,रिया चौहान,समीर गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.
चॅरिटी फॅशन शो साठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या डॉक्टरांनी उपस्थिती लावली.या शो मध्ये रॅम्प वॉक चे दोन राऊंड झाले यामध्ये पहिला राऊंड हा डिझायनर ड्रेस मध्ये तर दूसरा राऊंड (सोशल वर्क राऊंड) डॉक्टरांच्या व्हाईट एप्रॉन मध्ये पार पडला.
या फॅशन शो बद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले,मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आजपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात,काश्मिर मध्ये भारत-पाकिस्तान (LOC) सीमेलगत च्या गावात आजपर्यंत 2 लाखांहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. ‘ग्लॅम डॉक’ शो नंतरही सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप दुर्गम भागातील महिलांना करण्यात येणार आहेत.
या शोसाठी रायगडाच्या आई फाऊंडेशनचे आणि पुणे सोशल ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे योगेश पवार यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे बंड्या यांनी केले.