नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्रीय गृह मंत्रालयाने १२ जुलै रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनिर्देशित चार नव्या खासदारांची घोषणा केली आहे.
या यादीत ज्येष्ठ विधीज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम, केरळमधील सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.