पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथे रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूजच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी लंम्पी स्किन रोगावरील जनावरांच्या लसीकरणाचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पाडले. या कार्यक्रमात गावातील शेतकरी व पशुपालक यांना लंम्पी रोगाचे स्वरूप, लक्षणे, संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधक उपाय आणि लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
लंम्पी रोग हा गाई-म्हशींसाठी अत्यंत घातक असून त्याचा प्रसार डास, माशी आणि संक्रमित सुईद्वारे होतो. या रोगामुळे जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, दुधाचे उत्पादन कमी होणे, तसेच मृत्यू होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा अत्यंत प्रभावी प्रतिबंधक उपाय असल्याचे कृषीदूतांनी सांगितले.प्रात्यक्षिकामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष लसीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याने जनजागृती घडून आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी जनावरांच्या निगा, स्वच्छता, आणि पोषण व्यवस्थेचीही माहिती दिली.या उपक्रमात कृषीदूत: क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे आविष्कार यांनी सहभाग नोंदवला शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला आणि भविष्यातील अशा उपक्रमांची मागणी केली.
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा.डी.एस . मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.