पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथील सात होतकरू अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची निवड बहुराष्ट्रीय आयटी कंपनी कॉग्निझंट मध्ये झाली असून, त्यांना प्रतिवर्षी ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
माळेवाडी, अकलुज येथील ओम प्रकाश फुले, अहमदनगर येथील सार्थक प्रसाद नांदे, जित्ती, ता.मंगळवेढा येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, पंढरपूर येथील अमृता आण्णासो घाडगे, पंढरपूर येथील हरिप्रिया नारायण कुलकर्णी, पंढरपूर येथील उमामा नवोमन बेद्रेकर, श्रीपूर येथील प्रणाली प्रशांत पिसाळ या विदयार्थ्यांची कॉग्नीझंट कंपनीमध्ये निवड झालेली आहे.
कॉग्निझंट ही अमेरिका स्थित आघाडीची आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी असून, ती व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करते. १९९४ मध्ये स्थापना झालेली ही कंपनी सध्या तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहे. कॉग्निझंटचा भारतातील मुख्यालय चेन्नई येथे असून, ती विविध क्षेत्रांतील ग्राहकांना सॉफ्टवेअर विकास, क्लाउड सोल्युशन्स, डेटा अॅनालिटिक्स, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या सेवांमध्ये सहाय्य करते. कॉग्नीझंट ही कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी अभियांत्रिकीच्या सर्व शाखेसाठी उपलब्ध आहे.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ही निवड पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.”
कॉलेजच्या प्रशिक्षण व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर डॉ.समीर कटेकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कॉलेजने अनेक प्रशिक्षण उपक्रम राबवले आहेत. याचेच फळ म्हणून अशा नामांकित कंपन्यांमध्ये निवड होते आहे.” या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या निवडीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’च्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेतले होते. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.