पंढरपूर प्रतिनिधी तेज न्युज
पंढरपूर तालुक्यातील सन २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ९५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे पुनश्चः नव्याने सोडतीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार दि.१५ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोडत कार्यक्रमासाठी तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी हजर राहवे असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.