योजनेचे प्रथम लाभार्थी समाधान सिद्धनाथ बागल यांना चेअरमन नागेश फाटे यांच्या हस्ते होंडा शाईन दुचाकी प्रदान करून योजनेचा शुभारंभ
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पंढरपूर यांच्या वतीने सभासद व ग्राहकांसाठी वाहन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.
या वाहन कर्ज योजनेचा शुभारंभ योजनेचे प्रथम लाभार्थी ठरलेले समाधान सिद्धनाथ बागल यांना चेअरमन नागेश फाटे यांच्या हस्ते होंडा शाईन दुचाकी वाहन वितरण करून करण्यात आले.
या वाहन कर्ज योजनेच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना व्यवसाय, रोजगार व दैनंदिन गरजांसाठी वाहन मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट असून सभासदांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. असे आवाहन श्री.विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री विठ्ठल अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक समाधान फाटे, डॉ. रमेश फाटे, निवृत्ती पाटील, विनायक शिंदे, शाखाधिकारी संग्राम कापसे, सुमित बागल, ज्ञानेश्वर पवार, स्वप्नाली घोडके , हर्षा सुतार , श्रीधर पिसे, किशोर नपते, शरद थिटे, दत्तराव काळबांडे उपस्थित होते.