परीक्षेत उज्वल यश मिळवून शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने राहुल बाळासो धनवडे यांनी एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उज्वल यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहाय्यक अभियंता म्हणून क्लासवन अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल तसेच वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी भाळवणी येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झालेले अमित औदुंबर बागल यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी यश संपादन केलेल्या राहुल धनवडे व अमित बागल यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.हा सन्मान सोहळा कार्यक्रम पंढरपूर येथील श्री विठ्ठल अर्बन बँक व एन.पी कंट्रक्शन कंपनी येथील कार्यालयात संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना नागेश फाटे यांनी सुरुवातीला उज्वल यश संपादन करून शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल सहाय्यक अभियंता राहुल धनवडे व आरोग्यसेवक अमित बागल यांना शुभेच्छा देऊन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी श्री.विठ्ठल अर्बन बँकेचे सचिव रमेश एकनाथ फाटे, मॅनेजर संग्राम कापसे, एन.पी कन्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर निवृत्ती भाटकर, विनायक शिंदे, ज्ञानेश्वर पवार, किशोर नपते, शरद थिटे, समाधान कांबळे, समाधान बागल, आरोग्यसेवक अमित बागल यांच्या मातोश्री वर्षाराणी बागल, स्वप्नाली घोडके, हर्षा सुतार, श्रीधर पिसे, शुभम करे यांच्यासह श्री.विठ्ठल अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.