सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी एकादशीचा सोहळा श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे आनंदी व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. विठ्ठल रखुमाई, विविध संतांचा पोशाख धारण केलेले आणि हातात दिंड्या पताका घेऊन नाचणारे चिमुकले वारकरी, नामाचा गजर आणि भावभक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. सुरुवातीला विविध संत मंडळींच्या वेशभूषेतील वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दासोहमध्ये सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देण्यात आला. ह्या ग्रंथदिंडीमध्ये सोलापूर भूषण कै.मारुती चितमपल्ली यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या संग्रहित ग्रंथांचा अंतर्भाव होता.
शिक्षण व वाचन माणसाला सुसंस्कृत बनवते म्हणून या आशयाचे फलकही विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीत समाविष्ट केले होते. सदर कार्यक्रमासाठी श्री सुनील पुजारी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
अतिथी परिचय स्निग्धा कलशेट्टी हिने करून दिला. अक्षरा पाटणकर व सृष्टी पसारे यांनी प्रभावी सूत्रसंचलन केले. शलाका मठ हिची वारकरी संप्रदायाचे महत्त्व ही एकपात्री नाटिका, संस्कृती गवंडी हिचे भारुड सादरीकरण तसेच तनिष्का नागणे हिचे आषाढी वारीचे महत्त्व, प्रगती ऐवळे हिने सांगितलेले पंढरपूर मंदिराचे स्वरूप, भक्त पुंडलिक नाटिका, संत गोरा कुंभार नाटिका, समूहगीत, इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले समूहनृत्य इत्यादी कार्यक्रमांचा अंतर्भाव होता.
सुकृता कुलकर्णी हिने भैरवी सादर केली. प्रमुख अतिथिंनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल तसेच उत्तम सादरीकरणाबद्दल प्रशंसा केली. तसेच आषाढीचे धार्मिक महत्त्व ही विशद केले. श्री सिद्धेश्वर शिक्षण समितीचे विश्वस्त मा. श्री विलास कारभारी यांनी विद्यार्थ्यांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षिका सौ. नीता तमशेट्टी, रेणुका अरोरा, मराठी विभाग प्रमुख, अंजली खानापूरे, विजयालक्ष्मी बिराजदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी महाजन, श्रुती कुलकर्णी, विजयालक्ष्मी नष्टे, नीलावती खरात, सहदेव भालेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आभार प्रदर्शन प्रगती तिपरादी हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी इशिता गुमडेल पसायदान गायन केले.