सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
माणसांप्रमाणेच प्रत्येक झाड वेगळे असते.बागकामाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर झाडांशी समरस होऊन बागकर्मकला अंगिकारली तर निरोगी,आनंदी आयुष्य जगता येते असे प्रतिपादन ज्येष्ठ बाग कर्मी श्रीमती अनिता शिंदे तथा फुलराणी यांनी केले.
परसबाग सोलापूर या स्वयंसेवी पर्यावरणीय व्यासपीठाच्यावतीनें सोलापूरातील बागकर्मींसाठी अभ्यास बाग भेटीच्या दुस-या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी उपस्थित बागकर्मींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन ही परसबाग ची कार्यसंकल्पना आहे.त्यास अनुसरुच माझ्या आत्यामुळेच मला झाडांची- फुलांची आवड निर्माण झाली.वैद्यकीय क्षेत्रातील नौकरीत असताना एका शेतक-यानें दिलेल्या वांग्याच्या रोपानें माझ्या बागकामाला खरी दिशा मिळाली. तेंव्हा पासुन आज वयाच्या ८४ व्या वर्षी सुध्दा मी आनंदाने बागकाम करते असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या दोन छोट्याशा गच्चीवरची सर्व झाडे मातीच्या कुंडीत आहेत.जागा जेमतेम तीनशे फुट आहे.जमीनीत एकही झाड लावण्यासाठी जागाच नाही.त्यामुळे मी ४० एक हँगिंग मध्ये फुलांची झाडे लावली आहेत.माझ्याकडे आज कुंडीमध्ये शंभरपेक्षा जास्ती गुलाब आहेत.वीसेक प्रकारच्या शेवंती,फुलांनी बहरलेले दोन सोनचाफा आणि हिरवा चाफा, जाईजुई,मोगरा, गोकर्ण यासारख्या फुलवेलींनी माझी बाग कायम बहरलेली असते अशी माहिती त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली.सोनचाफ्यासह फुलं बागेची देखभाल,खतांचे नियोजन इत्यादी बाबत त्यांनी टिप्स दिल्या.त्यांनतर हास्य विनोद, प्रश्नोत्तरे, चर्चात्मक मार्गदर्शनाचे सत्र पार पडले. नारायण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रारंभी परसबागचे मुख्य प्रवर्तक श्री.नारायण व सौ.शुभदा पाटील,कार्य समन्वयक श्री.शिरीष व सौ.गौरी गोळवलकर यांनी फुलझाड देऊन श्रीमती अनिता शिंदे यांना परसबागच्यावतीनें शुभेच्छा दिल्या.यावेळी परसबागच्यावतीनें त्यांना सामुहिक अभिवादन करुनही शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
श्रीमती अनिता शिंदे यांच्या कुटुंबातील अभय भय,उदय,अजय ही मुले.मुलगी- सौ.माधवी,नातु - पंकज,प्रतिक्षा तसेच श्री.ज्ञानेश्वर कोंगे, सौ.वीणा गोली, सौ.सुनीता सोनवणे सौ.जयश्री हुच्चे, श्री.सुनील जाधव, सौ.मीना पटवा, श्री.राजेश पटवा, सौ.ज्ञानदा शहा,श्री.सुनील पसपुले,श्री.सचिन देशपांडे, श्रीमती.चंदा साखरानी, श्री.विजय साखरानी, सौ.जयश्री तासगावकर सौ.मीना पाटील भोसले,विजयकुमार कांबळे, सुधीर मोहोळकर, श्रीपाद दुनाखे,सविता सरडे - वैराग, सौ.निता पवार - गायकवाड आदींनी या अभ्यास बाग भेटीत सहभाग घेतला.