सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्राचे ऋषीतुल्य नेतृत्व व आपल्या सर्वांचे श्रध्दास्थान स्व.आबासाहेबांची पुण्यतीधी ३० जुलै रोजी व स्व.आबासाहेबांची जयंती १० आॕगस्ट रोजी असुन...या दोंन्ही कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठीची बैठक बुधवार दि.२३/७/२०२५ रोजी भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सह.सुत गिरणी येथे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये तालुक्यातील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी आप-आपली मते मांडली.अनेकांनी मतदार संघात कसे व कोणते कार्यक्रम असावेत या वर आपली मते मांडली.या मतांचा सारासार विचार करुन आसे ठरवीण्यात आले की..३० जुलै रोजी स्मृतीदीनी सुतगीरण सांगोला येथे स्व आबासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती भजन किर्तन तसेच बरोबर १२-०० वाजता फुलाचा कार्यक्रम होऊन अभिवादन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
तसेच त्यानंतर १० आॕगस्ट पर्यंत गावोगावी कींवा गण वाईज अथवा गटवाईज वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवण्यात येतील.त्यामध्ये वृक्षलागवड,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर,शालेय साहित्य वाटप,खाऊ वाटप ,शाळांमध्ये निबंध स्पर्धा , आसे उपक्रम राबविण्याचे ठरवण्यात आले.आशा उपक्रमांची माहीती येत्या दोन दिवसांत पक्ष कार्यालयात चिटणीस या़ंचेकडे अथवा प्रत्यक्षात आमदार साहेबांच्या पी.ए.कडे देण्यात यावी.त्यामुळे ३० जुलै ते १० आॕगस्ट दरम्यानचे नियोजन करता येईल.आसे बैठकीमध्ये ठरले.
तसेच स्व आबासाहेबांचा स्मृतीदीन व जयंतीचा कार्यक्रम हा गावोगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात व सोसायटी कार्यालयात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी स्व.आबासाहेबांच्या स्मृतिदीनाचे व जयंतीचे औचित्य साधत पुढील वर्षभर जे पुरुष अथवा महिला या ६० वर्षाच्या पुढील असतील त्यांची अॕंन्जोप्लास्टी व अॕन्जोग्राफी तसेच बायपास सर्जरी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहीती सुध्दा गावोगावी देण्याचे आमदार साहेबांनी सांगीतले.
येणाऱ्या काळात स्व आबासाहेबांचे स्मारक उभे करण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी बैठकीत भाई बाळासाहेब ऐरंडे यांनी केली.या नियोजनाच्या बैठकीस चिटणिस दादासाहेब बाबर ,महिला आघाडीच्या कल्पना-ताई शिंगाडे ,पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक गोडसे यांच्यासहित विविध संस्थांचे चेअरमन व्हा.चेअरमन व संचालक जिल्हा परीषद,पंचायत समीतीचे सदस्य,अनेक गावचे सरपंच उप सरपंच सदस्य,वेगवेगळ्या आघाडीमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी व गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली..

