मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गुरुनाथ तिरपणकर आर्यारवी एंटरटेनमेंटच्या वतीने प्रथमच नवोदित, हौशी गायक-गायिकांसाठी "कराओके गीत गायन" स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असल्यामुळे आणि आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायन कौशल्य असलेल्या नवोदित गायक–गायिकांसाठी आर्यारवी एंटरटेनमेंट ही संस्था त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लाईव्ह स्वरूपात कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न होणार असून सर्वांसाठी खुली असणार आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गीत गायन (सोलो) आणि समूह गीत गायन (डुएट) अशा गाण्यांचा समावेश असेल. प्रत्येक स्पर्धकाला एक वैयक्तिक गीत (सोलो) आणि एक समूह गीत (डुएट) अशी दोन गाणी गाण्याची संधी दिली जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाणी गाणे अभिप्रेत आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना संस्थेचे आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल हा त्याच दिवशी परीक्षकांमार्फत घोषित केला जाईल आणि त्यांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. या कराओके गीत गायन स्पर्धेत वैयक्तिक (सोलो) गीतासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. आणि समूह (डुएट) गीतासाठी प्रथम आणि द्वितीय अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी 30 जुलैच्या आत खाली दिलेल्या समन्वयकांशी मोबाईल वर किंवा व्हाट्सअँप वर संपर्क साधायचा आहे आणि आपली नोंदणी करायची आहे. *अर्ज नोंदणी साठी खालील समन्वयकांशी संपर्क साधावा:*
.अजीत साकरे-9819703763
.लक्ष्मी मनीष गुप्ता-8082096363
.गुरुनाथ तिरपणकर-9323662619
.महेश्वर भिकाजी तेटांबे-9082293867
.नितीन जाधव-9833163900
.अविनाश राऊत-7977627430
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून सोहळ्याचे स्थळ, दिनांक आणि वेळ स्पर्धकांना आठ दिवस अगोदर कळविण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.