तुंगत प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांचे नेतृत्वातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री.एम आय देशमुख यांनी कोन्हेरी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी ऊस लागवड, खत व्यवस्थापन, पाणी वापर कार्यक्षमता आणि नवीन कृषी तंत्रज्ञान, ऊसतोड यंत्रणा, ऊस तोडणी मशीन हार्वेस्टर, ट्रॅक्टर गाडी यावर सखोल माहिती देत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या, जसे की पाण्याचे व्यवस्थापन, खतांचे वाढते दर, ऊस तोडणीच्या वेळा आणि ऊस दर हमीभाव, ऊसतोड वाहतूक यंत्रणा अधिकाऱ्यांनी सर्व मुद्द्यांना समर्पक उत्तरे देत त्यावर उपाययोजना सुचवल्या.
यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सुरू असलेल्या प्रयोगात्मक पद्धतींचे अनुभवही शेअर केले. शेवटी शेती अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. उत्पादन वाढीसाठी आणि शाश्वत शेतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. यासह इतर कारखान्याच्या तुलनेत ऊस दराबाबत ही शाश्वती दिली.
यावेळी कोन्हेरी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य शेती अधिकारी एम. आय. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उप शेती अधिकारी नेताजी बोडके, ऊस पुरवठा अधिकारी दत्तात्रय कोळेकर साहेब, नागनाथ राऊत, यासह लोकनेते शुगरचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, बाजार समितीचे माजी संचालक रामचंद्र शेळके, सरपंच गणेश पांढरे, माजी उपसरपंच बाबुराव शेळके, तंटामुक्तीचे अध्यक्ष अंकुश जरग, सुभाष जरग, माजी सरपंच गोरख लवटे, उद्योजक देविदास देवकते, संजय जरग, सत्यवान चवरे, लखन धाईंजे, अनिल बचुटे, विजय पांढरे, नितीन जरग, सर्जेराव जरग, आनंद शेळके भुजंग माने, सज्जन माने, सुजित शेळके आदी सह शेतकरी उपस्थित होते.
जातींची निवड करताना जमिनीचा प्रकार, हवामान आणि पक्वता कालावधी विचारात घेऊन खतांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारख्या खतांचा वापर शिफारशीत मात्रेत करावा. हिरवळीचे खत वापरल्यास, स्फुरद खताचा काही भाग हिरवळीच्या पिकाला द्यावा.
उसाला पाण्याची गरज जास्त असते, त्यामुळे पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करता येते.ऊस पिकावर विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
एम.आय.देशमुख
मुख्य शेती अधिकारी, लोकनेते शुगर, अनगर