पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक रोजी 30/6/2025 फिर्यादी रुपेश अजितराव देवकाते वय 27 राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्या बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा राजीस्टर नंबर 544/25BNS 303 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्वरित प्रभावाने शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण 4 आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये 2 लाख 15 हजार व एक मोटरसायकल असा एकूण 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत.
तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस 2 जुलै 2025 रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखी मधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौजे चळे या गावातून जप्त केलेला आहे याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 251/ 25 बी एम एस कलम 303/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या मोटरी एकूण पाच तसेच एक मोटरसायकल असा एकूण 11 लाख रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे सहाय्यक फौजदार शेंडगे पोलीस हवालदार घंटे पोलीस हवालदार सय्यद बालाजी कदम सुधीर शिंदे दीपक भोसले सुहास देशमुख गजानन माळी सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ गोडसे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.पुढील तपास सुरू आहे.