भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी मंदिरात हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूर तालुका कार्यवाहक योगेश माने यांनी शिव राज्याभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिन याविषयी माहिती सांगितली.
यावेळी डॉ. नवनाथ खांडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रणजीत जाधव हे होते.
यावेळी प्रशांत माळवदे, वैभव कारंडे, जयंत म्हेत्रे,योगेश चौगुले, नागनाथ निराळी,अक्षय देशमुख, कौस्तुभ लिंगे, शुभम गवळी, आर्यन देशमुख, मयूर कोले आदि मान्यवर उपस्थित होते.तर आभार विश्वजित देशमुख यांनी मानले.