मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचलित बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल १०० % लागला असून कुमारी अश्मि महेश सावंत हीने ९७.६०% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि तिची बहीण कुमारी निधी सावंत हिने ९६% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कुमारी श्रेया संतोष सुतार हिने ९५% मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
त्याचप्रमाणे संस्थेच्या आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल जोगेश्वरी चा निकाल दरवर्षी प्रमाणेच १००% लागला असून कुमार प्रसाद प्रकाश नारकर याने ९६.६०% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमारी श्रावणी कदम हीने ९३% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी वैष्णवी धोबी हीने ९२.८०% मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
गुणवंत यशस्वी विद्यार्थी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सहदेव सावंत, उपकार्याध्यक्ष श्री अशोक परब, सरचिटणीस श्री. जितेंद्र पवार, चिटणीस सौ.सुरक्षा घोसाळकर, चिटणीस व शालेय प्रशासकीय समितीचे अधिकारी श्री यशवंत साटम, सहखजिनदार श्री विजय खामकर व का. सदस्या सौ. इंद्रायणी सावंत यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.