अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी सोहळ्यानिमित्त नागपूर येथे होत असलेल्या संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन 2026 च्या निमित्ताने 5 लाख शिंपी समाज बांधवांना नागपूर येथे आणण्याचे आवाहन केले आहे .
संपूर्ण भारतभर या विश्व महासंमेलनाचा दौरा चालू आहे त्यानिमित्ताने अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे, समन्वयक अनंतराव जंगजोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश मांढरे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख शल दिनकर पतंगे, आयोजन समितीच्या महाराष्ट्र अध्यक्ष सौ मीनल ताई कुडाळकर, शारदाताई जवंजाळ, पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष मुळे आणि कार्यकर्ते यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे.
त्या निमित्ताने अकलूज येथे समाज बांधवांचे मोठी मीटिंग घेण्यात आली आणि भास्कर टोम्पे आणि इतर सदस्यांनी शिंपी समाजाला या विश्व महासंमेलनाची का गरज आहे तसेच याचा फायदा येणाऱ्या तरुण पिढी आणि महिला सक्षमी करणासाठी होणार आहे हे समजून सांगितले. तसेच यातून सर्व शिंपी समाज एकत्र आला तर त्याचे फायदे अनेक आहेत हे उपस्थित सर्व अकलूज शिंपी समाज बांधवांना सांगितले. याप्रसंगी शिंपी समाजाचे किशोर चांडोले, नाना जवंजाळ, अरुण मामा लंगडे हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान संत नामदेव महाराज युवक मंडळ अकलूजचे अध्यक्ष गणेश सटाले सुयोग सोडाळ संत नामदेव सेवा ट्रस्ट अकलूजचे अध्यक्ष पांडुरंग मुळे नाना जामदार वैभव जामदार प्रवीण ढवळे तसेच संत नामदेव महाराज महिला मंडळ अकलूजच्या सदस्य मनीषा ढवळे वृषाली जंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी अकलूज माळीनगर माळशिरस नातेपुते वेळापूर येथून समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.