पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गादेगाव येथील पंकज अण्णासाहेब फाटे यांची आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विविध पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नागेश फाटे म्हणाले की गादेगावचे सुपुत्र पंकज अण्णासाहेब फाटे यांनी परीक्षेत यश संपादन करून गादेगावचे नाव लौकिक केले आहे. पुढील काळात त्यांचा आदर्श गावातील सर्व युवक घेऊन गावाचा नाव लौकिक करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संजय पवार, अण्णासाहेब फाटे, नितीन आसबे, डॉ. माणिक मस्के, डॉ. रमेश फाटे, निवृत्ती पाटील, विनय शिंदे, संग्राम कापसे, संतोष पुणेकर, वैजनाथ चवरे, सुमित बागल, सुरज फाटे, ऋषिकेश बागल अदी उपस्थित होते.