येथील हिंदु महासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी-इचगांवकर यांचा पुतण्या दुर्गाशंकर सुहास कुलकर्णी-इचगांवकर यांनी एमबीबीएस परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण मिळवून यश मिळवले आहे.दुर्गाशंकर कुलकर्णी-इचगांवकर यांचा चौफाळा तरूण व व्यापारी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे आधारस्तंभ स्व. सुहास कुलकर्णी-इचगांवकर यांचे ते चिरंजीव होत. व्यापारी, उद्योजक भाउसाहेब गंगाखेडकर यांनी आशिर्वाद दिले.
याप्रसंगी संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, विनोदराज लटके, नानासो परिचारक, सतिश बेणारे, गणेश देवकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संतोष कुलकर्णी, गोंदवलेकर भक्त मंडळाचे महेश क्षीरसागर, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष विकास मोरे, रेडिमेड असोसिएशनचे गणेश पवार, सुधीर गोडसे, बापू परदेशी,मा.पं.समिती सदस्य अर्जुन रोंगे, श्रीकांत वाडेकर,मनोज वाडेकर यांच्यासह व्यापारी व मित्र परिवार उपस्थित होता. शेवटी अभयसिंह व मंदारशेठ कुलकर्णी-इचगांवकर बंधूंनी सर्वांचे आभार मानले.