भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासवाडी तालुका पंढरपूर येथे सण २०२४-२५ या वर्षातील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
इयत्ता चौथीच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपंत लोखंडे बोलत असताना त्यांनी पाचवी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 500 रुपये बक्षीस जाहीर केले आहे . त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी शाळेतील मुलांचे कौतुक केले तसेच सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या यशराज देठे, शिवराज देठे व श्रीराज लोखंडे यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
त्याचबरोबर चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भेट वस्तू म्हणून आराम खुर्ची दिली .सदर कार्यक्रमांमध्ये यशराज देठे, शिवराज देठे, श्रीराज लोखंडे, समर्थ देठे, धनश्री लिंगडे, प्रेम लोखंडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे नियोजन पूर्णपणे विद्यार्थ्यांनी केले .
या कार्यक्रमाची प्रस्तावना धनश्री लिंगडे हीने केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही लोखंडे हिने केलेतर कार्यक्रमाचे आभार रितिका लोखंडे हिने मानले मुलांना शाळेच्या वतीने निरोप समारंभाच्या निमित्ताने मिसळपाव व जिलेबी देण्यात आली .सदर कार्यक्रमासाठी विष्णुपंत लोखंडे, सुधीर देठे, तानाजी देठे, अनिल लिंगडे,निळू लोखंडे, महादेव देठे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.