पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सिव्हिलाइज २ के २५ कार्यक्रम पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिव्हिलाइज २ के २५ या कार्यक्रमांमध्ये ब्रिक बॉण्ड, कॅड वॉर, टेक्निकल क्विझ, ग्रुप डिस्कशन, बी. जी. एम. आय यांचा समावेश होता. असे कार्यक्रम आयोजन केल्याने विद्यार्थ्यांची आकलन शक्ती, समस्या निदान इत्यादी गोष्टींमध्ये वाढ होते.
हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सेसामार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे ( अधिष्ठाता, आर अँड डी ), डॉ. यशवंत पवार, चंद्रकांत देशमुख, गणेश लकडे, अमोल कांबळे, अजित करांडे, डॉ. सत्यवान जगदाळे, शेखर पाटील, मिलिंद तोंडसे, सिद्धेश पवार, ओमकार बिडकर, सचिन घाडगे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संकेत गवळी, रोहित जैनकोप, लक्ष्मण चव्हाण, प्रणव जाधव, स्वप्निल मासाळ, अभिषेक देवरे, पूजा घायाळ, स्नेहा कदम, पुनम जाधव, अर्पिता भोसले, पूजा पाटील, वैष्णवी पवार आदीसह महाविद्यालयातील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.