भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
फेब्रुवारी 2025 मध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा झाली होती ,या परीक्षेमध्ये केसकरवाडीतील मुलगी कु. अर्पिता केसकर हिने 300 पैकी 264 गुण मिळवून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
तिचा राज्यात 19 वा तसेच जिल्ह्यात 14 क्रमांक आला आहे,अर्पितास वर्गशिक्षक श्रीम. गुजरे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले, चंद्रकांत वाघमारे,राहुल लंगोटे, अशोक मस्के तसेच शाळा समिती अध्यक्ष मनिषा मासाळ उपाध्यक्ष सीमा यमगर, केंद्रप्रमुख रासकर ,गटशिक्षणाधिकारी लिगाडे ,सर्व शाळा समिती सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.