सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे.
ही घटना आज (दि. १८ एप्रिल) रोजी घडल्याची माहिती असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.