अंधेरी प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
अंधेरी (पूर्व) येथील होली स्पिरीट रुग्णालयाबाबत नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींची दखल घेऊन खासदार रविंद्र वायकर यांनी होली स्पिरीट रुग्णालयात अचानक भेट देऊन संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.आणि रुग्णांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीचा जाब विचारला व इथून पुढे चांगली वागणूक द्यावी अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे असा सूचक इशारा दिला.धर्मादाय रुग्णालयाकडून गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता रुग्णालयाने प्राधान्य द्यावे असे निर्देश खासदार रविंद्र वायकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
या बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र खंदाडे , हृदयरोग तज्ज्ञ डॉ गजानन रत्नपारखी, कार्यकारी संचालक सिस्टर लीसी, उप - संचालक सिस्टर फेलसी, मेडिकल डायरेक्टर डॉ. सुसंन, माजी नगरसेवक प्रविण शिंदे, सदानंद परब, विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, विधानसभा संघटक संतोष गिरी, शाखाप्रमुख भालचंद्र जोशी, प्रकाश शिंदे, उपेश सावंत आणि स्वीय सहाय्यक सचिन निमकर, उमेश कदम व भाई मिर्लेकर उपस्थित होते.