माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
दसूर सावंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन इमारतीचे व स्नेहसंमेलना चे उद्घाटन माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील , आमदार उत्तमरावजी जानकर , माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपराणी मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब नाईकनवरे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार देशमुख, संजय सुरवसे, डॉक्टर बाळासाहेब जरे, शरद सावंत, उपसरपंच धनंजय सावंत, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, महालिंग नकाते साहेब, विस्ताराधिकारी सुप्रिया महामुनी मॅडम, पंचायत समिती बांधकाम उप अभियंता रणवरे साहेब, महिला बालकल्याण विभागाच्या आतार , भूमकर साहेब, मुख्याध्यापक किरण काळे सर, रामभाऊ अडसूळ सर, ग्रामसेवक रुपनवर व सावंतवाडी दसुर भागातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील साहित्यास देणगी देणाऱ्या देणगीदारांचे सत्कार खासदार मोहिते पाटील, आमदार जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.