पंढरपुर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच शरीराविषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा. देवकते मळा, पंढरपूर जि. सोलापुर हा अवैधरित्या वाळु चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्या करीता अवैध वाळुचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरा लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती.
जे की, भारतीय न्याय संहिता २०२३ मधीत प्रकरण ६ व १७ मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होती. एक "धोकादायक व्यक्ती" म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते त्याचेविरुध्द अनेकवेळा अवैध वाळु व्यवसायाशी संबंधित तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होती.
परंतु तो सदर गुन्हयात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता त्यांनतरही त्याचेवर पंढरपुर शहर पो. ठाणे गुरनं ८१/२०२५ भादवि कलम ११८,३५२,३५१,३ (५) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता तो कायदयाला जुमानत नव्हता म्हणुन सराईत वाळु तरकर गुन्हेगार नामे विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा. देवकते मळा, पंढरपूर जि. सोलापुर याचेविरुध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, अत्यांवश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा सन १९८१ मधिल कलम ३ (१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साो सोलापुर यांना पाठविणेत आला होता.
त्याअनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी.डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेने त्यास ताब्यात घेवुन "येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द" करणेत आलेले असुन पंढरपुर शहरातील वाळु तस्कर व शरीराविषयीचे गुन्हे करणारे व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले , पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ कल्याण ढवणे, शरद कदम, सचिन इंगळे, सुरन हेंबाडे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, विजय कांबळे, सुनिल बनसोडे, समाधान माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे, अनिस शेख तसेच सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.