पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज शनिवार दि.१२/०४/२०२५ रोजी अकलुज येथील नामवंत डॉक्टर एम. के. इनामदार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त श्री विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
डॉक्टर इनामदार यांना माणसातला देव माणूस ही म्हणून ओळखतात. त्यांनी सोलापूर जिल्हातील अति गंभीर रूग्णांचे उपचार करून त्यांनी प्राण वाचविले आहेत. रूग्णांना शारीरिक स्वास्थासोबत माणसीक बळ ही देणारे डोक्टर असा त्यांचा नावलौकीक आहे.
डॉक्टर इनामदार यांच्या वाढदिवसा निमीत्त मंदिरे समितीच्या वतीने संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी युवा सेना जिल्हा संघटक गणेश इंगळे व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.