पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या प्रथम सत्र परीक्षेत शेळवे (ता.पंढरपूर) येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकाल ८३ टक्के लागला असून या महाविद्यालयाचे हे प्रथम च वर्ष आहे. पहिल्याच वर्षी मिळालेल्या घवघवीत यशामुळे विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे ही सर्वत्र कौतुक होत आहे.
या परीक्षेत महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक सानिका बालाजी कदम (७८. ४०%), व्दितीय क्रमांक अविष्कार उत्तम चौधरी (७४%) तर तृतीय क्रमांक आश्लेषा प्रवीण कावरे (७२.४०%), कोमल श्रीकृष्ण कांदे (७२.४०%), मोनाली नागनाथ पवार (७२.४०%) यांनी मिळवला आहे. नव्याने स्थापन झालेल्या या नर्सिंग महाविद्यालयाचे शिस्तबद्ध वातावरण, नियमित शिक्षणप्रणाली व अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हे घवघवीत यश मिळाले आहे. आपल्या पाल्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे सार्थक झाले’ अशी बोलकी भावना यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.
या यशाबद्दल श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे,कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी, रजिस्ट्रार गणेश वाळके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.