पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक २५\३\२०२५ रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पंढरपूर तालुका लहुजी शक्ती सेना, दलित महासंघ, पुरोगामी संघर्ष परिषद, व मातंग एकता आंदोलन. या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार पंढरपूर यांच्या कार्यालयासमोर, एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून. वरिल संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव यांनी या आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी पांडुरंग खिलारे जिल्हाध्यक्ष. बहुजन समता पार्टी उमेश वाघमारे जिल्हाध्यक्ष. पुरोगामी संघर्ष परिषद.जयसिंग मस्के जि.उपाध्यक्ष- लहुजी शक्ती सेना.प्रकाश साठे जि.उपाध्यक्ष- मातंग एकता आंदोलन. अमोल खिलारे तालुकाध्यक्ष. दलित महासंघ.मुकुंद घाडगे तालुकाध्यक्ष. लहुजी शक्ती सेना.सुरेश मस्के तालुकाध्यक्ष. मातंग एकता आंदोलन. स्वप्नील मस्के तालुकाध्यक्ष. पुरोगामी संघर्ष परिषद यांनी असे आव्हान केले आहे.