पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक १६ मार्च, २०२५ रोजी शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपुर, कराड रोड, पंढरपुर येथे डी. एन. सुरवसे, अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती, तथा जिल्हा न्यायाधीश-१, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. एस. पाखले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास डॉ.आशा घोडके, स्त्री रोग तज्ञ, सोलापुर, श्रीमती के. पी. बेंडभर, अति. सरकारी अभियोक्ता, पंढरपुर, तसेच श्रीमती मोनिका खडके पाटील, पोलिस उपनिरीक्षक पंढरपुर शहर पो. ठाणे, पंढरपुर, यांना आमंत्रीत करण्यात आले होते. आशा घोडके यांनी महिलांच्या आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच के. पी. बेंडभर यांनी पोक्सो कायादयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मोनिका खडके पाटील, यांनी बालविवाह या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस. एस. पाखले यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. व त्यांना त्यांचे महत्तव पटवून दिले, तसेच शिबीरादरम्यान २ रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर एन एस. बुद्रुक यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे पुर्तता केली.
अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड आर. बी. चौगुले यांनी शिबीराची प्रस्थावना, शिबीराचे सूत्रसंचालन अॅड. ए. एम. देशमुख, शिबीराचे आभार उपाध्यक्ष अॅड एम. व्ही. कसबे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास मोठया संख्येने बचत गटाच्या महिला, अंगणवाडी महिला, पोलिस महिला कर्मचारी, व विधी स्वंयसेवक व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विधी स्वयंसेवक तथा अधिकार मित्र नंदकुमार देशपांडे. विधी सेवा स्वयंसेवक सुधीर येरगट्टीकर पांडुरंग कोल्हापूरकर अंकुश वाघमारे मैंदर्गीकर महेश भोसले आदी स्वयंसेवक उपस्थित होते