भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील कैलासवासी वासुदेव धोंडीराम लंगोटे (वय 86) यांचे आज २१/०३/२०२५ रोजी सकाळी 11.30 मिनिटांनी राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
लंगोटे यांनी भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय बांधकाम सुरू असताना मदतीकरीता विविध प्रकारची नाटके केली होती.त्यावेळी त्यांनी नाट्य कलाकार म्हणून भूमिका केली होती.ते विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभागी होत असत.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.ते शिक्षक राहुल लंगोटे व मिरची मसाला व्यापारी अमोल लंगोटे यांचे वडील आहेत.
तिसऱ्या दिवशीचा (सावडणे) विधी रविवार दिनांक 23/03/2025 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.