मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल वांद्रे मुंबई येथील पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज हे तब्बल ३२ वर्षांच्या सेवेनंतर आज दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.
या शाळेत ते १९९३ रोजी मराठी विषयाचे शिक्षक म्हणून दाखल झाले होते. आपल्या ३२ वर्षाच्या सर्व्हिस मध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्याना शिकविले, घडविले आणि त्यातील अनेक विद्यार्थी आज विविध ठिकाणी मोठ्या पोस्ट वर काम करीत आहेत.स्काऊट आणि गाईड देखील सर छान शिकवायचे.अनेक वर्ष दहावीचे बोर्ड मॉडरेटर म्हणून देखील सरांनी काम पाहिले.एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.शिक्षकी पेशा सोबतच त्समाजसेवेचे व्रत देखील अंगिकारून सरांनी आजवर अनेक गोर गरीब वंचित कुटुंबान देखील वेळोवेळी मदत केली आहे.
आदर्श शिक्षक, आदर्श समाजसेवक असे १०० हून अधिक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत.कार्यक्रमाची सुरुवात टीचर लिंडा अँथोनी यांनी प्रार्थनेने केली.शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी गिटार वाजवून त्यांच्यासाठी खास गाण गायलं तर मॅनेजर फादर हेन्री यांनी भाषणातून त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापिका रोझ लोबो यांनी त्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू दिली तर फादर शिनोय यांनी त्यांना ग्रीटिंग कार्ड प्रदान केलं.शाळेतील शिक्षक गणेश हिरवे यांनी भाषणातून फिलिप सरांचा जीवनपट उलगडला, त्यांच्या अनेक कामाबद्दल आणि विविध गुणांवर प्रकाश टाकला तसेच त्यांना जॉय संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह बहाल केले.
इयत्ता पाचवी ड च्या विद्यार्थ्यांनी सर विशाल तिकुडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कभी अलविदा ना कहना डान्स करून शुभेच्छा दिल्या तर आयुष जोशी याने जिंदगी के सफर मैं गुजर जाते है...हे गाण अत्यंत सुरेल आवाजात गायले.तसेच नववीतील अभिमन्यू याने देखील सरांबद्दल भावना व्यक्त केल्या.शिक्षका सीमा जोसेफ यांनी खास मोमेंटू, शाल आणि रोपटे देऊन सरांचे स्वागत केलं.सूत्रसंचालन शिक्षिका जया नायर यांनी केलं.कार्यक्रमाची सांगता पौष्टिक अशा दूधी हलव्याचे करण्यात आली.कार्यक्रमाची सुंदर आखणी शाळेतील दहावीच्या समितीने केली होती.